सौ. रेखा चित्रे

Crochet knighting & other art-work by Mrs. Rekha Chitre







Wednesday 14 December 2011

27. शास्त्रीय नाचाचे ड्रेसेस

१९७० च्या सुमारास माझ्या मुलीच्या शास्त्रीय नाचाचा कार्यक्रम सोलापूर येथे भुकंपग्रस्तांच्या मदतीसाठी होणार होता. आम्ही तेव्हा कोल्हापूरमध्ये राहात होतो. या कार्यक्रमासाठी लागणारे ड्रेसेस मी शिवले. तेव्हा प्रत्यक्श ते ड्रेसेस मी पाहिले नव्हते. फक्त फ़ोटोत बघून मी ते शिवले. त्याचे हे फोटो. भरतनाट्यच्या ड्रेसमधला दोन पायातला पंखा हा फारच कौशल्यपूर्ण भाग होता. पण मी प्रयत्नपूर्वक हे तिन्ही ड्रेसेस शिवले.

हा भरतनाट्यमचा ड्रेस :

अन हे दोन कथ्थकसाठीचे :

Sunday 13 November 2011

26. टॅटिंगची लेस

अन ही माझ्या साडीसाठी तयार केलेली टॅटिंगची लेस !

२५.भरतकाम

ही खुप आधी भरलेली एक फ़्रेम. याचे चित्र माझ्या धाकट्या काकाने काढून दिले होते. प्रसिद्ध अजंठा मधील शिल्पाची हे वेगळ्याच रुपातील कलाकृती !


Wednesday 26 October 2011

२४.गणपती

मधले जावई गणपती भक्त. त्यांच्यासाठी विणलेला हा गणपतीचा पडदा.
याचे डिझाईन मी करून दिले.

२३.दोन फ़ुलांचे बेडशीट


 
अन हा त्याच्या किनारीचा क्लोजअप

 

२२.वाहनांचा पडदा

धाकट्या नातवाला वाहनांची फ़ार आवड. त्याची ही आवड आजीने अशी पूर्ण केली. त्याला आवडणारी चित्र मी बसवून दिली आईला.

२१.सोफा बॆक्स

Tuesday 18 October 2011

२०.डबल बेडशीट

१९.चेअर बॆक्स आणि टीपॊय कव्हर

१८.डबल बेडशीट

१७.टेबल क्लॊथ

हा टेबलक्लॊथची वरची बाजू

अन ही त्याची किनार


१६.सिंगल बेडशीट

मोठे चित्र पाहण्यासाठी कृपया चित्रावर क्लिक करा

१५.डबल बेडशीट

मोठे चित्र पाहण्यासाठी कृपया चित्रावर क्लिक करा

१४.दाराचा पडदा

१३.छोट्या चौकोनांचे डबल बेडशीट

मोठे चित्र पाहण्यासाठी कृपया चित्रावर क्लिक करा
 मोठे चित्र पाहण्यासाठी कृपया चित्रावर क्लिक करा

१२.डबल बेडशीट

११.गोल डायनिंग टेबलक्लॊथ

 मोठे चित्र पाहण्यासाठी कृपया चित्रावर क्लिक करा

१०.मध्यापासून शेवटपर्यंत विणलले डबल बेडशीट

 मोठे चित्र पाहण्यासाठी कृपया चित्रावर क्लिक करा

९.गुलाबाच्या फ़ुलांचे बेडशीट

 मोठे चित्र पाहण्यासाठी कृपया चित्रावर क्लिक करा

८.झोला

७.बटवा

Wednesday 12 October 2011

२.माझी हरहुन्नरी आई !


सौ. रेखा सुरेश चित्रे, पूर्वाश्रमीची पद्मा दत्तात्रय प्रधान. वय ७७. दोन्ही डोळ्यांची मोतीबिंदूची ऑपरेशन १९८५च्या आसपास झाली. अन तेव्हापासून दोन्ही डोळ्यांना + १० नंबर आहे. डोळ्यांची ऑपरेशन्स झाल्या नंतर तिचे वाचन हळूहळू कमी होत गेले. वाचायला त्रास होतो म्हणून तिने मग आपला एक जुना छंद पुन्हा नव्याने सुरू केला.
तसे तर आम्ही मुली ( ४ बहिणी ) लहान असताना आमचे सर्व कपडे तीच शिवत असे. अगदी त्यावेळच्या फॅशनप्रमाणे दि ट्रेन या चित्रपटातील फ्रॉक्स पासून शरारा पर्यंत, अन माझ्या बहिणीच्या कथ्थक आणि भरतनाट्यमच्या ड्रेस पर्यंत सर्व ड्रेस ती स्वतः शिवत होतीच. 
अन कुटुंबातील जवळ्जवळ १०० - १२५ लोकांचे स्वेटर्स तिने हाताने विणले होतेच. बाहेरच्या ऑर्डर्स घेउन मशीनवरही अनेक स्वेटर्स तिने विणले. 
भरतकामाचे अनेक प्रकार, अगदी साड्याही तिने भरल्या. टॅटिंगच्या लेसेस, अगदी साड्यांच्याही तिने तयार केल्या.
पण आता डोळ्याच्या ऑपरेशन नंतर तिने क्रोशाने दोर्‍याची बेडशीटस विणायचा नवा उद्योग सुरू केला. खरे तर हे अगदी बारिक काम. पण तिची चिकाटी इतकी की आता तर आम्ही म्हणतो, आई झोपेतही हे काम करू शकेल. 
१९९० पासून आजपर्यंत तिने ३२ डबलबेडची बेडशीट्स विणली आहेत, ( आज २०१५ मधे हा आकडा ५० पार करून  सध्या तिचे ५२ वे डबल बेडशीट सुरू आहे.), २५ सिंगल बेडशीट्स विणली, १० टेबलक्लॉथ विणले, २ फूटांचे गोल रुमालांची तर गणतीच नाही. कुशन कव्हर्स आणि सोफा बॅग्सची ही गणतीच नाही. मुख्य म्हणजे या सर्व कलाकृतींची डिझाईन्स तिची तीच बसवते. त्याचे करावे लागणारे प्रचंड हिशोब तिच्या मनात पक्के असतात.
याच विणकामाच्या नमुन्यांचे काही फोटो इथे टाकते आहे.
आणि हे सर्व चालू असताना टि. व्ही वरच्या सर्व मराठी सिरियल्स पाहणे अन जोडीने सुडोकू सोडवणे चालू असते. अन ही सुडोकुही साधी नाहीत. नेहमीची सुडोकु १ ते ९ आकड्यांची असतात; ती १ ते १२, १ ते १६, १ ते २५ अशी सुडोकू भराभर सोडवत असते. स्वेटर्स करणे हे चालूच असते.
तिच्यावर एक सी. डी. ही मी तयार केली आहे, मराठी चॅनल्सकडे ती पाठवली होती, परंतु ओळखी नसल्याने त्याचा पाठपुरावा मला घेता आला नाही. येथे कोणाला तिचे काम आवडले तर कृपया मला मदत कराल ? केवळ तिचे हे प्रचंड काम लोकांपुढे यावे हाच दृष्टिकोन आहे. त्यात व्यावसाईक हितसंबंध नाहीत, ना तिचे, ना माझे. 
असो.
आता तिच्या कामाचे काही फोटो-
हा गणपती विणलेला दाराचा पडदा
A1.jpg
ही काही डबलबेडशीट्स
A2.jpg
A3.jpg
A4.jpg
A5.jpg
A7.jpg
हा ५ फुटी टेबलासाठीचा गोल रुमाल
A6.jpg
A10.jpg
अन हा ६ बाय ४ फुटी टेबलासाठीचा टेबलक्लॉथ
A11.jpg
माझ्या मुलाला गाड्या अन वाहनांचे फार वेड. म्हणून त्याच्या या आजीने त्याच्या खोलीच्या खिडकीला हा पडदा विणला
A8.jpg
अन हा दाराचा पडदा. कमानी खाली नाचणारे मोर
A9.jpg
अन ही माझी आई स्मित
A12.jpg

१.आईचा व्हिडिओ

माझ्या आईवर पूर्वी एक लेख लिहिला होता, आता हा व्हिडीओ टाकतेय.


You tube :